Video : तू आधी ऐकायला शिक…Bigg Boss Marathi च्या चावडीवर मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून वादांची मालिका काहीकेल्या थांबत नाहीये. पहिल्या दिवशी मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरुन वाद झाला. आठवडाभराच्या कालावधीत अनेक स्पर्धक टास्कदरम्यान एकमेकांशी भिडले. यानंतर शनिवारी महेश मांजरेकर यांनी चावडीवर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्येक स्पर्धकाची शाळा घेतली. ‘बिग बॉस’ च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावलं. पहिल्या दिवसापासूनच […]
ADVERTISEMENT
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून वादांची मालिका काहीकेल्या थांबत नाहीये. पहिल्या दिवशी मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरुन वाद झाला. आठवडाभराच्या कालावधीत अनेक स्पर्धक टास्कदरम्यान एकमेकांशी भिडले. यानंतर शनिवारी महेश मांजरेकर यांनी चावडीवर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्येक स्पर्धकाची शाळा घेतली.
ADVERTISEMENT
‘बिग बॉस’ च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावलं. पहिल्या दिवसापासूनच मीराने घरात भांडण करण्यास सुरुवात केली असून मीरा अनेक ठिकाणी चुकल्याचं महेश मांजरेकर म्हणाले. यावेळी स्पष्टीकरण देण्यासाठी मीराने प्रयत्न केला मात्र संतापलेल्या महेश मांजरेकरांनी तिला “तू आधी ऐकायला शिक” म्हणत मीराला चांगलंच सुनावलं.
याचसोबत प्रत्येक डावपेचात मीरासोबत असणाऱ्या गायत्री दातारलाही महेश मांजरेकरांनी शालजोडीतले लगावत मोलाचा सल्ला दिला.
हे वाचलं का?
सर्वात वाईट शेफने बनवलेला पदार्थ खाण्याच्या टास्कमध्ये दादूसने उत्तम खेळ खेळत घरातील स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आणलं होतं. महेश मांजरेकरांनी या टास्कसाठी दादूस यांचं कौतुक केलं, तर या टास्कमध्ये दादूसला पाठिंबा न देता इतरांनादेखील दादूस विरोधात करणाऱ्या मीरावर मांजरेकर चांगलेच भडकले. “मी दोन दिवसात घरात येतो आणि सेम रेसिपी करून तुला खाऊ घालतो, खाशील का?” असं म्हणत ते मीरासह दादूसला सपोर्ट न करणाऱ्या स्पर्धकांवर ते भडकले.
Bigg Boss Marathi 3 : महिला-महिला आणि भांडायला नंबर पहिला, सोनाली आणि तृप्तीमध्ये वादाची ठिणगी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT