कोलकात्याहून परतलेल्या भाजप आमदार आशिष शेलारांना कोरोनाची लागण

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. त्यातच आता माजी मंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना देखील कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याचं समोर आलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच जे-जे त्यांच्या संपर्कात आले होते त्यांना त्यांनी आपली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. त्यातच आता माजी मंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना देखील कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याचं समोर आलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच जे-जे त्यांच्या संपर्कात आले होते त्यांना त्यांनी आपली चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आशिष शेलार हे कोलकाताहून (Kolkata) मुंबईत परतले आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Vidhansabha Election) प्रचारासाठी आशिष शेलार हे कोलकात्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी कोलकात्यातील आपल्या प्रचाराचे काही फोटो आणि व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘माझी कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. माझं आवाहन आहे की, जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावं. तसंच वैद्यकीय सल्लाही घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांना मदतीसाठी उपलब्ध आहे!’ असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

आतापर्यंत राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यांनी त्यावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे.

CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाची लागण

गेल्या 24 तासात राज्यात 58 हजारांहून अधिक रुग्ण सापडले

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 58 हजार 952 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात काल दिवसभरात 278 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.64 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 39 हजार 624 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 29 लाख 5 हजार 721 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81.21 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 28 लाख 2 हजार 200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35 लाख 78 हजार 160 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 55 हजार 206 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 12 हजार 70 रूग्ण सक्रिय आहेत.

प्रमुख जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपुरात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. नागपुरात 65 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यात 1 लाख 12 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. ठाण्यात 84 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.

Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद

राज्यात 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन

दरम्यान, काल (14 मार्च) रात्री आठ वाजेपासून राज्यात 15 दिवसांसाठी कठोर लॉकडाऊन लागू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. यावेळी सरकारने अनेक कठोर निर्बंध घातले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp