BMC Election : भाजपचं ‘मिशन 135’; आशिष शेलारांची ‘स्ट्रॅटेजी’, ‘त्या’ 20 जागांवर विशेष नजर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऐन गणेशोत्सवात राज्यात राजकीय धुरळा जोरात उडताना दिसतोय. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानं राजकारण तापलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता भाजपनं मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी जोरात तयारी सुरू केलीये. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मिशन १३५ पूर्ण करण्यासाठी स्ट्रेटजी सांगितली.

ADVERTISEMENT

लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थित भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यात मुंबईतील काही माजी नगरसेवकही उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘मिशन १३५’ची घोषणा केली. मुंबई महापालिकेत सध्या २२७ जागा असून, त्यापैकी १३५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठरवलं आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : अमित शाहंचे मोठे वक्तव्य

बैठकीत पदाधिकाऱ्यांना बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे. आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढाई लढू” असं शेलार यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

मुंबई महापालिका निवडणूक 2022 : त्या १५ ते २० जागांवर भाजप देणार विशेष लक्ष

आशिष शेलार म्हणाले, “मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं १५ ते २० जागा थोड्या फरकाने गमावल्या. या जागांवर भाजपच्या उमेदवारांचा १०० ते १५० मतांनी पराभव झाला. त्या जागांवर आता विशेष लक्ष दिलं जाईल. या जागा जिंकण्यासाठी आता ताकद लावू.”

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी केली अमित शाहांची स्तुती

या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची स्तुती केली. खरा चाणक्य कोण, हे लोकांना आता कळलं आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून निवडणूक लढा, असं फडणवीस म्हणाले.

सामना : पुन्हा कमळाबाई, शहांच्या दौऱ्याचाही समाचार; भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेसाठी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेपेक्षा दोन कमी जागा भाजपच्या होत्या.

मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं सर्वस्व पणाला

आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं आधीपासूनच तयारी सुरू केलीये. काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या भाजपकडून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT