पठ्ठ्याने तरुणी बनून Facebook वरुन डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, २ कोटी मागवले आणि…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करुन चक्क २ कोटी रुपयांना दिल्ली येथील एका डॉक्टराची फसवणूक झाल्याची घटना यवतमाळ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रार मिळताच पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीकडून रक्कम हस्तगत केली आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकीत डॉक्टरासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याकडून दोन कोटी रोख रक्‍कम, मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली आणि त्यांनतर अकाऊंट अचानक बंद केल्याने स्वत:ची फसवणूक झाल्याचे डॉक्टरला लक्षात आले. यानंतर डॉक्टराने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालयात येऊन आपल्यावर ओढवलेली आपबिती सांगितली. तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी उपविभागीय पोलीस सायबर सेलला घटनेची शहानिशा करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेश दिले.

वसई : प्रेमभंग झालेल्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव

हे वाचलं का?

सायबर सेलच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या महिलेची माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. तपासाअंती डॉक्टरची फसवणूक करणारी महिला नसून तो पुरुष असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन स्थानिकांनी अरुणोदय सोसायटीतील एका घरी भाड्याने राहणाऱ्या इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी संदेश अनिल मानकरकडून एक कोटी ७२ लाख ७ हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ७८ लाख ६ हजारांचा मुद्येमाल जप्त केला. या प्रकरणातील आरोपी ची चौकशी सुरू आहे.

गॅसचा पाईप पत्नीच्या तोंडात टाकून हत्या, आरोपी पतीला मध्य प्रदेशातून अटक

ADVERTISEMENT

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरीत विश्वास ठेवू नये, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना सावधगिरी बाळगावी, असं आवाहन यवतमाळ पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

आईच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती समजली, १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या मुलीसह प्रियकर रंगेहाथ ताब्यात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT