BSNL 4G आणि 5G बाबत मोठी घोषणा; दूरसंचार मंत्री Ashwini Vaishnav यांनी दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jio आणि Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे, तर BSNL अजूनही 3G वर अडकून आहे. BSNL 4G सेवा लवकरच सुरू होऊ शकते. दूरसंचार कंपनी देशातील अनेक भागांमध्ये आपल्या 4G नेटवर्कची चाचणी करत आहे. जिथे खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर बीएसएनएलच्या 4जी सेवेसाठी लोकांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

जानेवारी २०२३ मध्ये देशभरात BSNL 4G लॉन्च होऊ शकतो

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं पुढील वर्षी जानेवारीमध्ये म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये देशभरात BSNL 4G लॉन्च होऊ शकतो. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की बीएसएनएल 4जी लॉन्चची तयारी सुरू आहे आणि पुढील वर्षीपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

हे वाचलं का?

5G सेवा कधी सुरू होणार?

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 4G नंतर काही दिवसांनी यूजर्सना 5G सेवा देखील मिळेल. BSNL 5G वर्ष 2023 च्या उत्तरार्धात लॉन्च केला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, BSNL 4G सेवा वापरकर्त्यांसाठी जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. ऑगस्ट 2023 पर्यंत टेलिकॉम कंपनी आपली 5G सेवा सुरू करू शकते. बीएसएनएलच्या विस्तारात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. दूरसंचार कंपनीला 4G आणि 5G सेवा रोलआउटसह त्यांचा वापरकर्ता आधार 20 कोटीपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलचा दबदबा होता

ADVERTISEMENT

5G लाँच प्रसंगी अश्विनी वैष्णव म्हणाले होते की BSNL 5G भारतात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. BSNL 5G लाँच झाल्यानंतरही, संपूर्ण देशात त्याचा विस्तार व्हायला वेळ लागेल. अलीकडे, अनेक कंपन्यांना वाचवण्यासाठी, सरकारने अनेक मदत पॅकेज जाहीर केले आहेत. एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलचा दबदबा होता. मात्र, कालांतराने सरकारी कंपनी इतर खासगी कंपन्यांच्या मागे पडली. बीएसएनएल अजूनही दूरसंचार क्षेत्रातील इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा स्वस्त सेवा देते. बीएसएनएलचा रिचार्ज प्लॅन इतर ब्रँडच्या तुलनेत स्वस्त आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT