Ram Mandir : अमित शाहांच्या कृपेनेच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली -राय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक मोठं विधान केलं आहे. राम मंदिर जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी अमित शाह यांच्या आशीर्वादानेच झाली, नाहीतर सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नसती, असं राय म्हणाले.

ADVERTISEMENT

अलिकडेच कर्नाटकात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत जाण्यासाठी आतापासूनच तिकीट बुक करा, कारण याच तारखेला भव्य राम मंदिराचं काम पूर्ण होणार आहे आणि रामलला त्यात विराजमान झालेले असतील.’

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सूर्य उत्तरायण झाल्यानंतर 14 जानेवारी 2024 नंतर अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हे वाचलं का?

अयोध्येतील राम मंदिर आणि मराठी माणसाचं योगदान, ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येचं रूप किती पालटलं?

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर ट्रस्टची बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ‘आजतक’शी संवाद साधला. यावेळी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ट्रस्ट मकर संक्रांतीनंतर प्राणप्रतिष्ठा करण्याबद्दल चर्चा करत आहे, तर दुसरीकडे अमित शाहांनी 1 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होईल असं म्हणत आहेत. राम मंदिर उभारणीत गृह मंत्रालयाचा हस्तक्षेप आहे का? असा प्रश्न चंपत राय यांना विचारण्यात आला होता.

ADVERTISEMENT

चंपत राय अमित शाह-सुप्रीम कोर्टाबद्दल काय म्हणाले?

त्याला उत्तर देताना चंपत राय म्हणाले, “बघा, त्यांच्याच (अमित शाह) कृपेनेच, नाहीतर सुप्रीम कोर्टात सुनावणीच झाली नसती. त्यांचा हस्तक्षेप म्हणत आहात, देशासाठी काम करणारं रक्त आहे ते. देशाच्या सन्मानाची रक्षा करण्यासाठी काम करणार ते रक्त आहेत. ते अमित शाह नाहीत.”

ADVERTISEMENT

चंपत राय यांना असंही विचारण्यात आलं की, अमित शाहांनी 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मग एक जानेवारी 2024 नक्की आहे का? त्यावर राय म्हणाले, “1 जानेवारी काय, जो मुहूर्त असेल, तसं करू.”

डिसेंबर 2023 पर्यंत गाभारा तयार होणार

अयोध्येत राम मंदिरात जानेवारी 2024 मध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, असं सांगितलं जात आहे. मंदिराचं पहिल्या मजल्याचं काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT