छत्तीसगड : नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत २२ जवान शहीद, रॉकेट लॉन्चरने जवानांच्या पथकावर हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्तीसगडच्या विजापूर येथील जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या ५ जवान शहीद झाले होते. नक्षलींविरोधात सुरु असलेल्या कारवाईत बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी एक मोहीम हातात घेण्यात आली. ज्यात काही जवानांचा मृतदेह हाती लागले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या ही २२ वर पोहचली आहे. सुरक्षा दलाचं संयुक्त पथक सुकमा आणि विजापूरच्या सिमेलगत कारवाई करत असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरु झाली. संयुक्त दलात सीआरपीएफ, जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलाचे जवान सहभागी होते. दरम्यान जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १२ ते १५ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ADVERTISEMENT

विजापूरच्या जंगलात काय घडलं?

सुकमा-विजापूर सीमाभागात बस्तरच्या दक्षिणेकडील जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ आहे. या पट्ट्यात शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई करण्यात हाती घेण्यात आली होती. शनिवारी (३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि पीएलजीएच्या नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ही धुमश्चक्री जवळपास तीन तास सुरू होती. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते, तर १२ जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाचे तब्बल १४ जवान बेपत्ता असल्याच समोर आलं. या जवानांच्या शोधमोहीमेसाठी मोहीम राबवण्यात आली ज्यात उर्वरित जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

हे वाचलं का?

नक्षल्यांचा तिन्ही बाजूने जवानांवर हल्ला –

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी तिन्ही बाजूनी जवानांवर हल्ला चढवला. एका बाजूने गोळीबार करुन, दुसऱ्या बाजूने जवानांवर रॉकेट लॉन्चर सोडण्यात आलं…तर एका बाजूने नक्षल्यांनी धारदार शस्त्रांनी जवानांच्या पथकावर हल्ला केला. छत्तीसगडच्या सीमेवर नक्षल्यांचा शेवटचा तळ असलेल्या या भागात सुरक्षा यंत्रणांची गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरु आहे. दरम्यान या चकमकीत सीआरपीएफने १२ ते १५ नक्षल्यांना कंठस्नान घातलं असून यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या भागात सुरक्षा यंत्रणांची पथकं अजुनही गस्त देत असून बेपत्ता असलेल्या जवानाचा शोध सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT