PM Narendra Modi यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या ‘या’ मागण्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मी वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. भेटीचा हेतू मी आधीच जाहीर केला आहे. आमच्या 12 मागण्या होत्या त्याबद्दल त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली. त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या. आम्हाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मागण्यांची माहिती घेतो असंही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. सगळे विषय त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय आम्ही मांडले आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आम्ही कोण कोणते विषय़ पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले?

हे वाचलं का?

मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.

50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यात यावी

ADVERTISEMENT

इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो

ADVERTISEMENT

मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण हा विषयही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला आहे

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही आम्ही पंतप्रधानांकडे मांडला

GST चं येणं लवकर मिळावं यासाठीही विनंती केली आहे

शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत अटी-शर्थी संबंधी आम्ही बीड मॉडेल तयार केलं आहे त्याबद्दलही चर्चा केली

बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं आदळत आहेत, तौक्ते वादळानेही दणका दिला. या वेळी जे मदत केली जाते ते निकष जुने झाले आहेत. आता ते निकष बदलण्याची गरज आहे याबाबतही आम्ही चर्चा केली

चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी मिळण्याबाबत चर्चा केली

मराठी भाषा दिन असतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलली जावीत अशीही विनंती केली.

CM Uddhav Thackeray पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीत, चंद्रकांत पाटील-फडणवीस ‘शकुनी’ डाव टाकणारच-राष्ट्रवादी

अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही’ अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT