औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आणखी एका शहराचं नामांतर?; एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

मुंबई तक

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला अलिकडेच राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे नामांतराचा मुद्दा बाजूला पडला होता. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर केलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
Google CTA

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला अलिकडेच राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे नामांतराचा मुद्दा बाजूला पडला होता. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर केलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले आहेत.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? संजय राऊत यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,’ असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.