पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल.त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सत्य जनतेसमोर आणलं जाईल यात काहीही शंका नाही. गेले काही दिवस, […]
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल.त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सत्य जनतेसमोर आणलं जाईल यात काहीही शंका नाही. गेले काही दिवस, काही महिने असंही लक्षात आलं आहे की आयुष्यातून उठवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. असा प्रयत्न होऊ नये आणि सत्यही समोर आलं पाहिजे यासाठी योग्य जे काही असेल ते केलं जाईल.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गेले दोन दिवस चर्चेत आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
हे वाचलं का?
पाहा पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणात का गप्प आहेत यासंदर्भातला व्हिडीओ
नेमकं काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण या तरूणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली. ही मुलगी पुण्यात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी भावासोबत राहत होती. ती पुण्यात ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीवरून उडी मारून तिने तिचं आयुष्य संपवलं. यासंदर्भातल्या 12 ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या. यानंतर भाजपने थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
भाजपकडून राजीनाम्याची मागणी
शुक्रवारीच देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये संदर्भात आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्सचा संदर्भ घेऊन पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनी या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याचीच मगणी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली दखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलीस राज्य सरकारला नोटीसही दिली आहे तसंच या प्रकरणाची चौकशी केली जावी असंही म्हटलं आहे.
पूजा चव्हाण ही तरूणी टिकटॉक या सोशल अॅपवर चांगलीच प्रसिद्ध होती.
टिकटॉकवर फेमस होती पूजा
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरूणी टिकटॉक स्टार होती. तसंच अनेक राजकारण्यांशी तिचे जवळचे संबंध होते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो पाहिले तरीही ही बाब लगेच लक्षात येते. आता तिच्या आत्महत्येनंतर भाजपने संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT