Uddhav Thackeray : भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? राजकारण्यांसाठीही टेंडर काढा
हृदयात राम आणि हाताला काम हे चित्र सध्या देशात दिसतं आहे. अग्निपथ योजना आणून सरकार काय साध्य करू इच्छितं आहे? भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? चार वर्षांसाठी सैन्यात ट्रेनिंग दिलं जाणार ड्रायव्हिंग शिकवलं जाणार, सुतारकाम शिकवलं जाणार नाव देणार अग्निवीर. मोठमोठी नावं द्यायची पुढे काय? भाडोत्री सैन्य आणणार असाल तर मग राजकारण्यांसाठीही टेंडर काढा […]
ADVERTISEMENT

हृदयात राम आणि हाताला काम हे चित्र सध्या देशात दिसतं आहे. अग्निपथ योजना आणून सरकार काय साध्य करू इच्छितं आहे? भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? चार वर्षांसाठी सैन्यात ट्रेनिंग दिलं जाणार ड्रायव्हिंग शिकवलं जाणार, सुतारकाम शिकवलं जाणार नाव देणार अग्निवीर. मोठमोठी नावं द्यायची पुढे काय? भाडोत्री सैन्य आणणार असाल तर मग राजकारण्यांसाठीही टेंडर काढा असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत, ती उगाच झालेली नाहीत. जे काही शक्य आहे तेच वचन आपण लोकांना दिलं आहे आणि ते वचन पूर्ण करून दाखवलं आहे. शक्य न होणारी वचनं आपण देत नाही. अशी वचनं द्यावीत जी पाळता येतील. नुसतं राम राम करण्याला अर्थ नाही हाताला काम देणं महत्त्वाचं आहे असंही उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं आहे.
“विधान परिषद निवडणुकीसाठी मी…” उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अग्निपथ मुळे तरुण रस्त्यावर उतरलेत. हृदयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात दिसतंय. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्नीवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नोकरीचा पत्ता नाही.
Sanjay Raut : हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे!
शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला वयाच्या १६ व्या वर्षी घेतला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी लिहिली. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळंच वापरा आणि फेका. पंतप्रधान, मुख्यमंत्री या सगळ्याच पदांसाठी टेंडर काढा ना असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
.
विधान परिषदेबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
विधान परिषद निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करणार नाही. त्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावीच लागते. तशी ठेवली गेली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपले आमदार, खासदार, नगरसेवक या सगळ्यांना एकत्र ठेवणं ही लोकशाहीच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजचं हे चित्र आहे की आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून बडदास्त ठेवली आहे. हे जे चित्र मला दिसतंय ते विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरही दिसलं पाहिजे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं