नवरदेवाच्या हौसने दाखवलं पोलीस स्टेशन! ढोल ताशांच्या तालावर हळद लागली, पण…

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मल्हार खान येथे एका व्यक्तीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी वाद्य वाजवले जात होते. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी परवानगी न घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत नवरदेवासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे…. तुळशीविवाहानंतर विवाहसोहळे सुरु झाले आहेत. कोरोनाच्या लाटेनंतर आता निर्बंध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मल्हार खान येथे एका व्यक्तीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी वाद्य वाजवले जात होते. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी परवानगी न घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत नवरदेवासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे….

तुळशीविवाहानंतर विवाहसोहळे सुरु झाले आहेत. कोरोनाच्या लाटेनंतर आता निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे जंगी विवाहसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, शहरात पोलिसांची परवानगी न घेतल्यास कारवाई होत असल्यामुळे लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp