‘मविआ’शी संघर्ष, वादग्रस्त विधान… भगतसिंह कोश्यारींनी राजीनामा का दिला?

मुंबई तक

Bhagatsinha Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल असलेले रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक, कोश्यारी यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. यासाठी त्यांनी पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी ट्विट करून लिहिले की, (Pm Narendra Modi) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Bhagatsinha Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल असलेले रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक, कोश्यारी यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. यासाठी त्यांनी पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी ट्विट करून लिहिले की, (Pm Narendra Modi) ‘पीएम मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान मी माझ्या सर्व राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कामांमध्ये घालवण्याची माझी इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. मला पंतप्रधान मोदींकडून नेहमीच आपुलकी मिळाली आहे आणि मला आशा आहे की या बाबतीतही तेच मिळेल. Why did Bhagat Singh Koshyari resign

भगतसिंह कोश्यारींचा अमित शाहांकडे माफीनामा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर म्हणाले…

जवळपास 3 वर्षे राज्यपालांच्या खुर्चीवर असलेले कोश्यारी यांनी या छोट्या कार्यकाळात अनेकदा आपल्या वक्तव्यांनी आणि निर्णयांनी वाद निर्माण केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांची महाविकास आघाडीसोबतचा वाद उघडपणे दिसून आला.तर दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधत भाजपच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप केला. अशी विधाने त्यांनी अनेकदा केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्यांना माफीही मागावी लागली. या वर्षी जानेवारीत त्यांनी महाराष्ट्र राजभवनात आयोजित जैन समाजाच्या एका कार्यक्रमात सांगितले होते की, या पदावर आपण खूश नसले तरी अध्यात्मिक लोक गव्हर्नर हाऊसमध्ये येतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तेव्हा मला खूप आनंद होतो.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांची 2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. याआधी ते नैनितालचे खासदारही राहिले आहेत. 2002 ते 2007 पर्यंत ते उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर 2008 ते 2014 पर्यंत ते उत्तराखंडमधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हे वाचलं का?