Congress : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या; थोरातांचं नाव गायब

मुंबई तक

मुंबई : छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात काँग्रेसचे (Congress) ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणाऱ्या या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. (Congress […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात काँग्रेसचे (Congress) ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणाऱ्या या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. (Congress President Mallikarjun Kharge has constituted the Drafting Committee and various Subgroups, for the 85th Plenary Session of the Indian National Congress)

बाळासाहेब थोरातांचं नाव वगळलं :

यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मिलिंद देवरा अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. पण यातील एकाही समिती किंवा उपसमूहामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर रोष व्यक्त केल्यानं त्यांचं नाव वगळलं आहे की तब्येतीच्या कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?

  • मसुदा समितीचे सदस्य

हे वाचलं का?

    follow whatsapp