मुख्यमंत्री ‘व्होट बँके’चं राजकारण करताहेत; काँग्रेस नेत्याचं राज्यपालांना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर शिवसेनेनं परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्र’वार’ बघायला मिळालं. दरम्यान, राज्यातील महिलांवरील वाढत्या घटनांवरून काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात साकीनाका बलात्कार घटनेबद्दल भाष्य केलेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याच्या राज्यपालांच्या मागणीचंही समर्थन केलं आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?

हे वाचलं का?

मा. भगतसिंह कोश्यारीजी

राज्यपाल

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा आणि परप्रांतीयांच्या अवमानाचा तीव्र निषेध

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या बलात्काराच्या आणि हिंसेच्या घटनांसंदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा सल्ला चांगला आहे. आपण हा गांभीर्याने घेतला, याबद्दल आपले आभार मानतो.’

‘साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या परप्रांतीयांना यासाठी जबाबदार ठरवलं आहे. एक बलात्कारी कोणत्याही धर्माचा, भाषेचा, जातीचा असू शकत नाही. त्याला फक्त फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.’

‘मागील काही महिन्यांपासून मुंबईत महिलांवरील हिेंसेच्या घटनांमध्ये १४४ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या २ हजार ६१ घटना घडल्या आहेत.’

‘साकीनाका प्रकरणात ‘पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही’, असं बेजबाबदार विधान मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलं. हे सरळ सरळ स्वतःची जबाबदारी झटकण्यासारखं आहे. अशा बेजबाबदार पोलीस आयुक्तावरही कारवाई व्हावी.’

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका प्रादेशिक पक्षाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या राजकारणाचा आधार प्रादेशिक वाद आहे. त्यामुळेच साकीनाका बलात्कार घटनेवरून ते परप्रांतीयांना लक्ष्य करून त्यांच्या व्होट बँकेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.’

‘कोणत्याही मुख्यमंत्र्याकडून इतर राज्यातील लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य करणं निंदनीय आहे.’

‘महाराष्ट्रातील इतरही काही छोटे पक्ष अशा काही घटनांतील आरोपींच्या सामाजिक पार्श्वभूमीचा आधार घेऊन पुर्ण परप्रांतीय लोकांवर टीका करण्याचं राजकारण करत आहे.’

‘काही महिन्यांपूर्वी एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी यांच्याच पक्षातील एका मंत्र्याला पदाचा राजीनामा द्यावा लागला. तो मंत्री परप्रांतीय होता का?’

‘जर मुख्यमंत्रीच एखाद्या गुन्हेगारी घटनेवरून राजकारण करत असतील, तर राज्यातील जनतेनं निष्पक्ष न्यायासाठी कुणावर अवलंबून राहायचं? त्यामुळेच तुम्हाला हे पत्र लिहणं मला योग्य वाटलं.’

‘महाविकास आघाडी सरकारमधील तथाकथित सेक्युलर नेतेही (समाजवादी) परप्रांतीयांच्या अपमानावर मौन धारण करून बसले आहेत. यावरून असंच वाटतंय की, परप्रांतीयांचा अपमान महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचाच भाग करण्यात आला आहे. हे सगळे सेक्युलर नेते मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली असल्याचं दिसत आहे.’

‘काही दिवसांपूर्वीच डोंबिवली व इतर काही ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना सर्वांना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. या घटनांतील आरोपी कोणत्याही धर्म, भाषा वा प्रदेशातील असो, सगळ्यांनाच कठोर शिक्षा व्हायला हवी. सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत. पण, सगळे आरोपी कोणत्यातरी एका विशिष्ट राज्याचे आहेत का? क्रूर गुन्हा करणारे आरोपी ना कोणत्या धर्माचे असता, ना जातीचे असतात.’

‘त्यामुळेच मला पूर्णपणे विश्वास आहे की, तुमचा अनुभव आणि तुम्ही उचललेली कठोर पावलं महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम ठेवण्यात सहाय्यक ठरतील. कृपया आपण न्याय करावा… आभार.’

आपला विश्वासू

-विश्वबंधू राय

सदस्य (अखिल भारतीय काँग्रेस समिती)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT