फडणवीसांकडून काउंटडाऊन.. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोणाला दिला इशारा?

मुंबई तक

नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. अशात सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. राजकीय पुढारीही या शुभेच्छांना अपवाद नाहीत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओतून देवेंद्र फडणवीस यांनी एक काऊंटडाऊन दिला आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या व्हीडिओतून त्यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. अशात सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. राजकीय पुढारीही या शुभेच्छांना अपवाद नाहीत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओतून देवेंद्र फडणवीस यांनी एक काऊंटडाऊन दिला आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या व्हीडिओतून त्यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेला व्हीडिओ?

देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओमध्ये 10 टू 1 असा एक काऊंटडाऊन दिला आहे. या प्रत्येक काऊंटडाऊनच्या मध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असताना, ते संवाद साधत असताना, आशीर्वाद घेत असतानाची दृश्यं आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही ते अभिवादन करताना दिसत आहेत. पंकजा मुंडेंसोबतही दिसत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही दिसत आहेत. ही सगळी दृश्य आणि अत्यंत वेचक आणि वेधक पद्धतीने या काही सेकंदांच्या काऊंटडाऊंमध्ये पेरण्यात आली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या व्हीडिओतून कुणाला सूचक इशारा दिला आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तानाट्याचे 36 दिवस चाललेले प्रयोग, त्यानंतर नवं सरकार येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा झालेला पहाटेचा शपथविधी. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र विसरलेला नाही. तसंच महाविकास आघाडी सरकारचा प्रयोगही महाराष्ट्र विसरलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आणि वेगळ्या विचारधारा असलेले काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp