कोरोनाचं पुन्हा थैमान! 24 तासांत 58 हजारांपेक्षा अधिक रुग्ण; ओमिक्रॉन रुग्णही 2 हजारांच्या पुढे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. देशात दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर टाकली आहे. देशात 58 हजार 97 रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही 2,000 च्या पुढे गेली आहे. कालच्या (4 जानेवारी) तुलनेत 24 तासांत आढळून आलेले रुग्ण 55.4 टक्के अधिक आहेत.

ADVERTISEMENT

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांत देशात 58,097 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत 15,389 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा वेग वाढल्याने देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,14,004 वर पोहोचली आहे.

…तर जानेवारीत महाराष्ट्रात कोरोनाचे 80 लाख रूग्ण, राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

हे वाचलं का?

देशातील पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 18,466 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 9,073 रुग्ण, दिल्लीत 5,481 रुग्ण, केरळात 3,640 रुग्ण तर तामिळनाडूमध्ये 2,731 रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 67.8 टक्के रुग्णसंख्या या पाच राज्यांत आढळून आली आहे. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 31.78 टक्के इतकी आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 534 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यू केरळात (453) झाले असून, त्यानंतर महाराष्ट्राचा (20) क्रमांक लागतो. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,82,551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईहून गोव्यात गेलेल्या क्रूझमधील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मज्जाव

ADVERTISEMENT

देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 2 हजारांच्या पुढे

कोरोना रुग्णसंख्येबरोबरच देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या 2,135 वर पोहोचली आहे. यापैकी 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (653 रुग्ण) आढळून आले आहेत. तर दिल्ली (464 रुग्ण) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कुठे आणि किती ओमिक्रॉन रुग्ण आढळले?

मुंबई- 408

पुणे मनपा-71

पिंपरी-38

पुणे ग्रामीण-26

ठाणे मनपा-22

पनवेल-16

नागपूर-13

नवी मुंबई-10

सातारा-8

कल्याण डोंबिवली-7

उस्मानाबाद आणि कोल्हापूर-प्रत्येकी 5

वसई-4

नांदेड, भिवंडी-प्रत्येकी-3

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली-प्रत्येकी 2

लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर आणि अमरावती-प्रत्येकी 1

एकूण संख्या-653

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT