सोलापूर : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, माजी आमदार रविकांत पाटील यांना जुगार खेळताना अटक

मुंबई तक

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळ परिसरात असलेल्या एका हॉटेलवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जुगाराचा अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील कारवाईचे कामकाज विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरु होते. होटगी रोडवर विमानतळाशेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळ परिसरात असलेल्या एका हॉटेलवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जुगाराचा अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील कारवाईचे कामकाज विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरु होते.

होटगी रोडवर विमानतळाशेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे. त्याठिकाणी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाने रात्री ११ च्या सुमारास त्या हॉटेलवर छापा टाकला.त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले.

या छाप्यात पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्‍या तब्बल २९ जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वच जुगार्‍यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणले गेले.त्याठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp