CSK vs LSG :ऋतुराजची हाफ सेच्युरी, चेन्नईने लखनऊला दिले ‘इतक्या’ धावांचे आव्हान

मुंबई तक

Ruturaj Gaikwad Half Century : लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Half Century) खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे.या त्याच्या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावल आहेत.

ADVERTISEMENT

Ruturaj Gaikwad Half Century
Ruturaj Gaikwad Half Century
Google CTA

Ruturaj Gaikwad Half Century : चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)पुन्हा एकदा त्याचा फलंदाजीची कमाल दाखवली आहे. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Half Century) खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे.या त्याच्या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने 217 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे लखनऊ जाएंट्ससमोर 218 धावांचे असणार आहे. (csk vs lsg ruturaj gaikwad hits half century second ipl match)

ऋतुराज गायकवाडने (ruturaj gaikwad) लखनऊ जाएंट्स (Lucknow Super Gaints) विरूद्द तुफानी खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 31 बॉलमध्ये 57 धावा ठोकल्या आहेत. या त्याच्या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले आहेत. 200 च्या स्ट्राईक रेटने तो मैदानात धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीने चेन्नईच्या डावाला चांगली सुरुवात झाली होती. डेवोन कॉन्वेने देखील त्याला चांगली साथ दिली होती. डेवोन कॉन्वे 47 धावा करून आऊट झाला होता.

#RuturajGaikwad Half Century ??#CSKvLSG #WhistlePodu #Yellove#Ruturaj #Rutu #CSK #ChennaiSuperKings pic.twitter.com/jaRNY4GY8F