पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, तरी का बोलवावी लागली ऑक्सिजन एक्सप्रेस?
पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) पुण्यात (Pune) सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होत असल्याचं दिसून येत आहे. पण असं असलं तरी काल (11 मे) रात्री उशिरा पुण्यातील लोणी काळभोर येथे ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) दाखल झाली. ओरिसाच्या अङ्गुल या स्टेशनवरुन निघालेल्या या ऑक्सिजन […]
ADVERTISEMENT
पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) पुण्यात (Pune) सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होत असल्याचं दिसून येत आहे. पण असं असलं तरी काल (11 मे) रात्री उशिरा पुण्यातील लोणी काळभोर येथे ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) दाखल झाली. ओरिसाच्या अङ्गुल या स्टेशनवरुन निघालेल्या या ऑक्सिजन एक्सप्रेसमध्ये तब्बल 4 भले मोठे टँकर असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
पुण्याच्या लोणी काळभोर या रेल्वेस्टेशनच्या यार्डमध्ये ऑक्सिजन (Oxygen) ट्रेन काल रात्री 12 वाजेच्या सुमारास पोहचली. ओरिसाहून निघालेली ही ऑक्सिजन ट्रेन चार भले मोठे ऑक्सिजन टँकर घेऊन पुण्यात पोहचली. या चारही टँकरमध्ये मिळून एकूण 55 मॅट्रिक टन एवढा ऑक्सिजन साठा आहे. हा सर्व ऑक्सिजन पुण्यातील रुग्णालयांसाठी आणि विशेषत: कोरोना रुग्णांसाठी वापरला जाणार आहे.
पुण्यासाठीची पहिली #OxygenExpress काही वेळापूर्वी दाखल
ओदिशामधील अङ्गुल येथून 4 टँकर्स मधून 55 मेट्रिक टनहून अधिक प्राणवायू घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणी स्थानकात दाखल@PiyushGoyal @RailMinIndia@mybmcHealthDept@airnews_pune @Info_Punepic.twitter.com/wsMCgejuNq
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) May 11, 2021
दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं की, गेल्या काही दिवसात शहरातील आसपासचे जे ऑक्सिजन प्लांट आहेत त्यामध्ये काही प्रमाणात बिघाड झाल्याने तिथून रुग्णालयांना जो ऑक्सिजन पुरवठा केला जात होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची काळाजी घेऊन दुसऱ्या राज्यातून तात्काळ पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मागवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
पुणे शहराला दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. मागील काही दिवसात राज्याला साडे बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन हा प्रतिदिन लागत आहे. त्यात सर्वाधिक ऑक्सिजन हा पुणे जिल्ह्यासाठी लागत होता. एकट्या पुणे जिल्ह्याची सव्वा तीनशे मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती.
Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?
ADVERTISEMENT
दरम्यान, आता कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी देखील काही प्रमाणात कमी झाली आहे. पण तरी सुद्धा दोन प्लांटमध्ये बिघाड झाल्याने ऑक्सिजनची कमरता भासू नये यासाठी महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांनी याबाबतची कल्पना केंद्र सरकारला दिली आणि तात्काळ रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन मागवून घेतला.
ADVERTISEMENT
पुण्यात हे चारही ऑक्सिजन टँकर पोहचल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताफ्यात ते चाकणच्या प्लांटवर पोहचविण्यात आले. त्यानंतर ते इतर टँकरमध्ये भरुन पुण्यातील विविध भागात पाठविण्यात आले आहेत.
Big Relief : विशाखापट्टणमहून महाराष्ट्रात पोहचली ऑक्सिजन एक्स्प्रेस
पुणे जिल्ह्यातील कोरोनाची नेमकी स्थिती काय?
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 9,38,474 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 8,32,583 जण बरे झाले आहेत. तर 10,102 कोरोना रुग्ण हे दगावले आहेत. तर आज घडीला पुणे जिल्ह्यात 95,731 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत आता पुण्यातील कोरोनाचे रुग्ण हे हळहळू कमी होऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT