Dehli: भारतात ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळला, लस घेणाऱ्या लोकांसाठीही घातक

मुंबई तक

कोरोना ओमिक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार भारतात आढळून आला आहे. दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलमधील अभ्यासात हे समोर आले आहे. एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार म्हणाले की, ओमिक्रॉनच्या नवीन उप-प्रकार BA 2.75चा प्रसार दर जास्त आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहिले जात आहे. ओमिक्रॉनचा व्हेरिएंट लस घेतलेल्या लोकांवरही करतो परिणाम “जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना ओमिक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार भारतात आढळून आला आहे. दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलमधील अभ्यासात हे समोर आले आहे. एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार म्हणाले की, ओमिक्रॉनच्या नवीन उप-प्रकार BA 2.75चा प्रसार दर जास्त आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहिले जात आहे.

ओमिक्रॉनचा व्हेरिएंट लस घेतलेल्या लोकांवरही करतो परिणाम

“जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या 90 नमुन्यांवर हा अभ्यास करण्यात आला. नवीन प्रकारात वेगाने पसरण्याची क्षमता आहे. नवीन उप-प्रकार शरीरात आधीच अस्तित्वात असलेल्या अँटीबॉडीजवर हल्ला करतो आणि लस घेतलेल्या लोकांवरही परिणाम करतो,” अशी माहिती सुरेश कुमार यांनी दिली. त्यामुळे हा उपप्रकार जास्त घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणून चिंता वाढली आहे.

‘या’कारणामुळे वाढत आहेत दिल्लीत रुग्ण

गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. मास्क न घालणे आणि पूर्णपणे लसीकरण न करणे याशिवाय, नवीन उप-प्रकार हे देखील दिल्लीतील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे एक कारण आहे, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वानी लस घेत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय

दिल्लीत सोमवारी 1,372 रुग्ण आढळले आहेत तर सहा मृत्यूची नोंद झाली. सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट 17.85 टक्क्यांपर्यंत वाढला, जो 21 जानेवारीनंतरचा उच्चांक आहे. मंगळवारी दिल्लीत कोविड-19 मुळे सात मृत्यू आणि 2,495 ताज्या रुग्णांची नोंद झाली. सणासुदीच्या अगोदर रुग्णांमध्ये होणारी वाढ सरकार आणि रहिवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ठाण्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक

एकीकडे दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. मागील काही दिवसात ठाणे जिल्हा आणि परिसरात मोठ्याप्रमाणात स्वाईन फ्लूबाधित रुग्ण आढळत आहेत. ठाण्यात एकूण २०६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीत ४८, नवी मुंबईत २२, मिरा भाईंदरमध्ये पाच, ठाणे ग्रामीणमध्ये तीन, बदलापूरमध्ये दोन आणि अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा सामावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp