ग्रेटा थनबर्ग एफआयआर प्रकरणी दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबई तक

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतातल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट करून टुलकिट शेअर केल्यानंतर तिच्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल केल्याचे वृत्त होते. मात्र हे वृत्त एफआयआरमध्ये ग्रेटाचं नाव नसल्याचं दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत स्पष्टीकरण देताना, केवळ टुलकिटची निर्मिती करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी एफआयआरमध्ये कोणाचेही नाव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतातल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट करून टुलकिट शेअर केल्यानंतर तिच्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल केल्याचे वृत्त होते. मात्र हे वृत्त एफआयआरमध्ये ग्रेटाचं नाव नसल्याचं दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत स्पष्टीकरण देताना, केवळ टुलकिटची निर्मिती करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाहीय. फक्त टुलकिटच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट केलंय. एफआयआरमध्ये आम्ही कोणाचेही नाव घेतलेले नाही. फक्त टुलकिटच्या निर्मात्यांविरोधात हा एफआयआर आहे. दिल्ली पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे, असं प्रवीर रंजन यांनी सांगितलं. या टुलकिटमध्ये आंदोलनासंदर्भातली माहिती आहे. खलिस्तान समर्थकांनी हे टुलकिट बनवल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अज्ञातांविरोधात कलम १५३ अ आणि कलम १२० ब या कलमातंर्गत धर्माच्या आधारावर वैर निर्माण करण्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने दिल्ली सीमेवर आंदोलन करणार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना हे टुलकिट सुद्धा टि्वटरवर शेअर केलं.

तिने शेअर केलेल्या टुलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भातली माहिती होती. सर्वप्रथम तिने टुलकिट शेअर केलं, मात्र नंतर ते ट्विट तिने डिलीट केलं. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा तिने सुधारित टुलकिट शेअर केलं होतं. त्यानंतर याबाबत बोलताना आपण अजूनही भारतातल्या शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp