फडणवीस-अमित शाह भेट; राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष, केसरकरांचं मोठं वक्तव्य!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या सत्ता नाट्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिथे गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा थरार आता थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर भाजप राज्यपालांकडे काही मागणी करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. तिकडे एकनाथ शिंदेंही दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांकडे मागणी केली. अविश्वास प्रस्तावासाठी स्वत: राज्यपालांनी पाऊल उचलावं असे केसरकर म्हणाले आहेत. गुवाहटीच्या रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आमदारांना फडणवीस आणि आसामच्या पोलिसांनी सरंक्षण दिले असे केसरकर यांनी कबुल केले आहे. आम्ही महाराष्ट्रात यायला तयार आहोत परंतु आम्हाला रोखलंय कोणी संजय राऊत यांनी, लोकं रस्त्यावर उतरले आहेत, असेही केसरकर म्हणाले आहेत.

दुसरीकडे येत्या दोन-तीन दिवसांत भाजपाचे सरकार स्थापन होईल. तसेच आषाढी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडेल असा मोठा गोप्यस्फोट खासदार चिखलीकरांनी केला आहे. ज्यावेळी भाजपचे सरकार स्थापन होईल तेव्हा शिवसेनेचे १० ते १२ खासदार आमच्यासोबत येतील असेही चिखलीकर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

शिंदे-भाजप सत्तेचा फॉर्म्युला; उपमुख्यमंत्री पदासह १३ मंत्रीपदं, ‘या’ आमदारांना मिळणार संधी

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत, तिथे ते भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाची दुपारी बैठक होणार आहे. बैठकीमध्ये काय चर्चा होईल हे माध्यमांसमोर पोहोचवले जाईल असे एकनाथ शिंदे यांनी स्वत: सांगितले आहे. दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत प्रवक्ते आहेत, ते सर्व माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवतील असे शिंदे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT