Devendra Fadnavis: पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात: फडणवीस
नागपूर: ‘आज अनेकवेळा पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु मला असं वाटतं की, राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो.’ असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात केलं आहे. एकीकडे राज्यात गेल्या तीन वर्षांपासून राजकारणच बदलेलं आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये प्रचंड दुरावा वाढल्याचं पाहायला […]
ADVERTISEMENT

नागपूर: ‘आज अनेकवेळा पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु मला असं वाटतं की, राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो.’ असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात केलं आहे.
एकीकडे राज्यात गेल्या तीन वर्षांपासून राजकारणच बदलेलं आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये प्रचंड दुरावा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष फुटल्याने राज्यातील राजकारण अधिकच ढवळून निघालं आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यातून त्यांना नेमकं दर्शवायचं आहे याबाबत मात्र आता चर्चा सुरू झाली आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘वसंतराव नाईकांसोबत खूप चांगले संबंध जवाहरलाल दर्डा यांचे होते. पण नंतर काही कारणांमुळे जेव्हा त्यांना वेगळं व्हावं लागलं तेव्हा देखील खूपच सभ्यतेने त्यांनी एक अग्रलेख लिहला. ज्यामध्ये ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी अशा प्रकारचे शब्द वापरून.. त्या अग्रलेखातही वसंतराव नाईकांचीही त्यांनी स्तुती केली. त्यासोबत विचारांनी वेगळं झालो आहोत. पण मनाने नाही अशा प्रकारचा भाव सांगितला.’
‘आजच्या राजकारणात हे याकरिता महत्त्वाचं आहे की, आज अनेकवेळा पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. परंतु मला असं वाटतं की, राजकारणात आपण वैचारिक विरोधक असतो. विचारांचा विरोध असतो, व्यक्तीचा विरोध नसतो.’
