Vikram Gokhale Health Condition : विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून आज एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये विक्रम गोखले यांच्या तब्येतीत हळूहळू सुधरणा पहायला मिळत आहे, असं सांगण्यात आलं आहे. तसंच विक्रम गोखले हे आता डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यासह […]
ADVERTISEMENT
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून आज एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये विक्रम गोखले यांच्या तब्येतीत हळूहळू सुधरणा पहायला मिळत आहे, असं सांगण्यात आलं आहे. तसंच विक्रम गोखले हे आता डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
यासह पुढील 48 तासात त्यांना लावण्यात आलेलं व्हेंटिलेटर देखील काढलं जाऊ शकतं, असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर विक्रम गोखले यांचं ब्लड प्रेशर आणि हार्ट स्टेबल आहे, अशी माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसात त्यांच्याबाबत अनेक अफवा पसरवणाऱ्या बातम्या समोर येत होत्या. मात्र डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं होतं.
अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्यामुळे बुधवारी त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील बोललं जात होतं. गेल्या चोवीस तासात ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत अशी महत्त्वाची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे डॉक्टर शिरीष याडगिकर यांनी गुरुवारी दिली होती. मात्र, शुक्रवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार किंचित का होईना त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसंच ते डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत असल्याची महत्वाची सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हे वाचलं का?
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास आहे. तसंच त्यांना जलोदर झाला आहे. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम गोखले यांनी अनेक नाटकांमधून, सिनेमांतून आणि सीरियल्समधून कामं केली आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकांमधल्या अभिनयातून संन्यास घेतला होता. मात्र सिनेमांमध्ये त्यांनी काम करणं सुरू ठेवलं आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या गोदावरी या सिनेमात नारोशंकर देशमुख ही भूमिका त्यांनी साकारली आहे. मारूतीच्या पायाला पाणी लागलं का? हा त्यांचा एकमेव डायलॉग सिनेमात आहे मात्र त्यांनी स्मरणात राहणारी भूमिका साकारली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT