चंद्रपूर: ‘इथं’ सापडली डायनासोरची हाडं?; नेमके कसे सापडले महाकाय अवशेष?
विकास राजूरकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, 3 फूट लांब बरगडीचे हाड आढळले असून त्यांचा आकार पाहता ते डायनोसोर ह्या विशालकाय प्राण्याचे असावेत असा अंदात व्यक्त करण्यात आला आहे. परंतु तेथील भूस्तर पाहता हे 15-20 हजार वर्षापूर्वीच्यां दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भूशास्त्र आणि […]
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, 3 फूट लांब बरगडीचे हाड आढळले असून त्यांचा आकार पाहता ते डायनोसोर ह्या विशालकाय प्राण्याचे असावेत असा अंदात व्यक्त करण्यात आला आहे. परंतु तेथील भूस्तर पाहता हे 15-20 हजार वर्षापूर्वीच्यां दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी वर्तवला आहे.
कसे सापडले हे महाकाय अवशेष?
स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडकं आढळली होती, परंतु ही हाडं आहेत की दगडं याबाबत त्यांना काही कळले नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे ह्यांच्याशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली.