दिराने असं काय केलं की वहिनीला त्याचं गुप्तांगच कापावं लागलं? धक्कादायक खुलासा

मुंबई तक

Crime News ; दीराने असं काय केलं की वहिनीला त्याच गुप्तांग कापावं लागलं? धक्कादायक खुलासा

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दीराने असं काय केलं की वहिनीला त्याच गुप्तांग कापावं लागलं?

point

गुप्तांग कापलेल्या जखमी तरुणाच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मऊआईमा परिसरात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. 20 वर्षीय युवकाचं गुप्तांग कापल्याची ही घटना 16ऑक्टोबरच्या रात्री घडली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे ही अमानवी कृती त्याच्या स्वतःच्या वहिनीने केल्याचं तपासात उघड झालं आहे. कारण फक्त इतकंच – युवकाने वहिनीच्या लहान बहिणीशी लग्न करण्यास नकार दिला होता.

घटनेची पार्श्वभूमी

मऊआईमा परिसरातील मलखानपूर गावातील उमेश नावाचा तरुण आणि त्याची  वहिनी मंजू हिची लहान बहिण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून ओळख वाढली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि उमेशने लग्नाचं आश्वासनही दिलं होतं. मात्र कुटुंबीयांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी नातेसंबंधातील जवळिकीमुळे या लग्नाला तीव्र विरोध केला.

हे ही वाचा>> 30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं

यामुळे उमेशनेही लग्न करण्यास नकार दिला आणि सांगितलं की तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. या नकारामुळे  वहिनी मंजू संतापली. तिच्या बहिणीने उमेशच्या नकारानंतर नैराश्याचा झटका बसल्याने ती गप्प, उदास राहू लागली. बहिणीची अवस्था पाहून मंजूच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली आणि तिने भीषण कृत्याचा निर्णय घेतला.

16 ऑक्टोबरच्या रात्री, जेव्हा उमेश घरात झोपला होता, तेव्हा मंजूने स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणि त्याच्या खोलीत शिरली. उमेश अविवाहित असल्याने तो वेगळ्या खोलीत झोपत असे. तिथे जाऊन मंजूने सलग चार वेळा चाकूचे वार केले आणि त्यानंतर त्याचा गुप्तांग कापला. उमेश वेदनेने ओरडू लागला, पण तोपर्यंत मंजू पळून गेली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp