Disha salian death : नारायण राणे-नितेश राणेंना दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या रिपोर्टमुळे झटका
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणात मोठी घडामोड घडलीये. दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलेलं होतं. पण, सीबीआयच्या अहवालानं या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे. […]
ADVERTISEMENT
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणात मोठी घडामोड घडलीये. दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलेलं होतं. पण, सीबीआयच्या अहवालानं या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिशा सालियन प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या अहवालाबद्दल वृत्त दिलं आहे. दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआयनं तपासाअंती म्हटलेलं आहे.
‘दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आणि दिशा सालियन प्रकरणाचा संबंध सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडला गेला. दिशा सालियन काही काळासाठी सुशांत सिंह राजपूतसाठी काम करत होती. तिच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यात आलीये,” असं वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘ईटी’ला सांगितलं.
हे वाचलं का?
दिशा सालियन प्रकरणातील आरोप भोवले?, नारायण राणेंसह नितेश राणेंवरही गुन्हा
“तपासात हे निष्पन्न झालंय की, दिशा सालियनने 8 जून रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याच घरी गेट टूगेदर पार्टी आयोजित केली होती. त्या रात्री दिशा सालियनने मद्य प्राशन केलेलं होतं. त्यामुळे तिचा तोल गेला आणि घसरून ती खाली पडली,” असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचे, जे त्या रात्री पार्टीत सहभागी झाले होते, त्यांचे जबाब तपासण्यात आले. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि ढकलून दिल्यामुळे होणाऱ्या जखमांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या सीन रिक्रएटच्या निरीक्षणंही यात बघितली गेली आहेत.
ADVERTISEMENT
दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप
दिशा सालियन सुशांत सिंह राजपूतकडे मदतीसाठी गेली होती?
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन या दोन्ही घटना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही घटनांचा संबंध जोडणं दुर्दैवी आहे. दिशा सालियनवर हल्ला करण्यात आला आणि ती सुशांत सिंह राजपूतकडे मदतीसाठी गेली होती. तिथे मोठा राजकीय कट केला गेला, आरोपात काहीही तथ्य नाही. तपासात तसं काहीही आढळलेलं नाही, असंही अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे-नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केले होते आरोप
दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठं राजकारण झालं. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनची हत्या करण्यात आलेली असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होत.
दिशा सालियन गर्भवती होती, असा आरोपही करण्यात आला होता. दिशा सालियनवर अत्याचार करण्यात आले आणि तिथे मंत्री होता, असं म्हणत राणेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंच्या दिशेनं अंगुली निर्देश केले होते.
या प्रकरणात दिशा सालियनच्या आईवडिलांनी नारायण राणेंविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राणेंची मालवणी पोलिसांनी चौकशीही केलेली आहे.
नितेश राणेंनीही तर आमचं तोंड बंद करण्याच प्रयत्न होतोय असं म्हटलं होतं. दिशा सालियनवर बलात्कार करण्यात आला. दिशाच्या मृत्यूवेळी ती गरोदर होती. तसचं दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी झालेल्या पार्टीत राजकीय पक्षाचे नेते होते असाही आरोप करण्यात आलेला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT