Omicron Variant : ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; आरोग्यमंत्र्यांनी लोकांच्या मनातील भीती केली दूर

मुंबई तक

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला आणि प्रचंड वेगाने पसरत असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही चंचुप्रवेश केला आहे. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला असून, त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन करत जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला आणि प्रचंड वेगाने पसरत असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही चंचुप्रवेश केला आहे. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला असून, त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन करत जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं शनिवारी (4 डिसेंबर) स्पष्ट झालं. परदेशातून येणाऱ्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवले जातात. जिनोम सिक्वेन्सिग चाचणीत त्याला ओमिक्रॉनचा संसर्घ झाल्याचं निष्पन्न झालं.

Omicron: मोठी बातमी.. महाराष्ट्रातही झाली ओमिक्रॉनची एंट्री, ‘या’ शहरात सापडला पहिला रुग्ण

डोंबिवली आढळून आलेला हा रुग्ण राज्यातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण असून देशातील चौथा रुग्ण आहे. महाराष्ट्रात रुग्ण आढळून आल्यानंतर ओमिक्रॉननं महाराष्ट्रातही पाऊल ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन चाचण्या केल्या जात आहे. दरम्यान, यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, राजेश टोपे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.