कुख्यात डॉन दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या ताब्यात, मनी लाँड्रीग प्रकरणी कारवाई
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे कारागृहातुन ED ने ताब्यात घेतलं आहे. इकबाल कासकर ला घेऊन ed चं पथक मुंबईच्या दिशेने रवाना, मुंबईत वैद्यकीय चाचणी करुन इकबाल ला विशेष पीएमएलए न्यालायात करणार हजर, मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी […]
ADVERTISEMENT

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे कारागृहातुन ED ने ताब्यात घेतलं आहे. इकबाल कासकर ला घेऊन ed चं पथक मुंबईच्या दिशेने रवाना, मुंबईत वैद्यकीय चाचणी करुन इकबाल ला विशेष पीएमएलए न्यालायात करणार हजर, मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीने कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतलं आहे त्यामुळे लवकरच इकबाल कसकरला ईडी अटक करू शकतं अशीही चिन्हं आहेत.
ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
ईडीने जी कागदपत्रं ताब्यात घेतली आहे त्या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी छोटा शकीलचा मेहुणा सलीम याची चौकशी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सलीमने अनेकदा पाकिस्तानात गेल्याचा संशय एजन्सींना आहे. तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करतो, असा ईडीचा विश्वास आहे.