मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नका ! अजित पवारांचा संजय राऊतांना टोला
राज्यात सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं. त्यातचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना या अग्रलेखात अनिल देशमुखांना अपघाताने […]
ADVERTISEMENT
राज्यात सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं. त्यातचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना या अग्रलेखात अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्री मिळाल्याचं म्हणत एका नवीन चर्चेला तोंड फोडलं. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनीही राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत सरकार व्यवस्थित काम करत आहे. कोणीही मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये असा टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधिकार आहे की त्यांच्या पक्षात कोणाला मंत्रीपद द्यायचं. सोनिया गांधींचा अधिकार आहे की काँग्रेसमधला कोण व्यक्ती मंत्री बनेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपद कोणाला द्यायचं हा निर्णय शरद पवार घेत असतात. तीन पक्षाचं सरकार व्यवस्थित काम करत आहे अशा वेळेस कोणीही मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये.” बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मांडली.
दरम्यान, ‘अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले आहेत.’ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याचबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर विमानतळावर दोनदा प्रश्न विचारण्यात आला. पण दोन्हीही वेळी अनिल देशमुखांनी वेगळ्याच मुद्द्यावर बोलत हा प्रश्न टाळला. त्यांनी राऊतांच्या कोणत्याही टीकेला यावेळी उत्तर दिलं नाही. पण यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती देखील दिली.
हे वाचलं का?
शरद पवारांची अहमदाबादमध्ये अमित शाह यांच्याशी शनिवारी भेट? जाणून घ्या नेमकं काय घडलं
पाहा नेमकं म्हटलंय अनिल देशमुखांविषयी ‘सामना’मध्ये
ADVERTISEMENT
‘अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे.’
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री का बोलत नाहीत? -फडणवीस
‘सामना’तील अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
-
सरकारच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा फज्जा!
गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले.
महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱया घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडत आहेत. जे राष्ट्र आपले चारित्र्य सांभाळण्याची दक्षता घेत नाही ते राष्ट्र जवळजवळ नामशेष झाल्यासारखेच आहे असे खुशाल समजावे. जे राष्ट्र सत्य, सचोटी, सरळपणा आणि न्यायनिष्ठा या सद्गुणांची किंमत जाणत नाही आणि त्या गुणांना मानत नाही ते राष्ट्र जिवंत राहण्यालादेखील पात्र नसते. विलासी वृत्ती हेच ज्या राष्ट्राचे दैवत आहे, ज्या राष्ट्रातील लोक केवळ स्वतःसाठीच जगतात किंवा जेथे एखादी छोटी व्यक्ती स्वतःला देव समजते त्या राष्ट्राचे दिवस भरत आले आहेत, असे खुशाल समजावे.
आज आपल्या देशाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाबतीत हे प्रश्न विचारले जात आहेत याचे दुःख वाटते. महाराष्ट्राचे एक मंत्री संजय राठोड यांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण खाली बसत नाही तोच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याचे प्रकरण आजही खळबळ माजवीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT