“सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषीसारखे” इमाम इलियासींचं वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी दिल्लीतल्या मशिदीला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मुस्लिम नेत्यांशी चर्चाही केली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलियासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची चर्चा झाली. मोहन भागवत यांच्या भेटीनंतर उमर इलियासी यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. त्यांनी दिलेली ही उपमा चांगलीच चर्चेत आहे. खास करून सोशल […]
ADVERTISEMENT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी दिल्लीतल्या मशिदीला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मुस्लिम नेत्यांशी चर्चाही केली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलियासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची चर्चा झाली. मोहन भागवत यांच्या भेटीनंतर उमर इलियासी यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. त्यांनी दिलेली ही उपमा चांगलीच चर्चेत आहे. खास करून सोशल मीडियावर या उपमेची चांगलीच चर्चा होते आहे.
“प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं?” मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य
काय म्हणाले उमर इलियासी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषींप्रमाणे आहेत. माझ्या निमंत्रणानंतर ते आज या ठिकाणी आले आहेत. देवाची पूजा करण्याच्या आमच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मात्र आज मोहन भागवत या ठिकाणी आल्यानंतर एक चांगला संदेश देशभरात गेला आहे. तसंच आमच्या पद्धती एक असल्या तरी आम्ही माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म मानतो.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली मशिदीला भेट
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतल्या मशिदीला भेट दिली. त्यानंतर मुस्लिम नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. त्याआधी मोहन भागवत यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम नेत्यांशीही चर्चा केली.