Satara चे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात घुसलं पाणी, मुसळधार पावसाने हाहाकार

मुंबई तक

सातारा: साताऱ्याचे (Satara) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांच्या कराड (Karad) येथील घरात पावसाचं पाणी घुसल्याचं नुकतंच समोर आलं आहे. यामुळे त्यांच्या घरातील बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं आहे. तसंच आजूबाजूच्या परिसरात देखील पाणी शिरल्याने येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काल (मंगळवार, 1 जून) अचानक झालेल्या ढगफुटीमुळे (Heavy rain) कराडसह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

सातारा: साताऱ्याचे (Satara) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांच्या कराड (Karad) येथील घरात पावसाचं पाणी घुसल्याचं नुकतंच समोर आलं आहे. यामुळे त्यांच्या घरातील बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं आहे. तसंच आजूबाजूच्या परिसरात देखील पाणी शिरल्याने येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

काल (मंगळवार, 1 जून) अचानक झालेल्या ढगफुटीमुळे (Heavy rain) कराडसह आजूबाजूच्या परिसरात हाहाकार उडाला. या संपूर्ण भागात अवघ्या काही तासात प्रचंड पाऊस कोसळला. ज्याचा फटका खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला. यामुळे नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी दुपारी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस धो-धो कोसळत होता. या ढगफुटीमुळे कराडसह मलकापूर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकान गाळ्यांसह झोपडपट्टी व घरांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली.

मलकापूर शहरातील आगाशिवनगर परिसरात अनेक कॉलनी आणि घरात पाणी शिरले. तर पुणे-बंगळूर महामार्गालगत असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात देखील पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. तसेच घराच्या बाजूला असलेल्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. फुलझाडे वाहून गेले असून लॉन भिजून नुकसान झाले आहे.