भाजप-शिंदेंच्या आमदारात बिनसलं! राणा पाटलांनी केली थेट मंत्रालयात तक्रार
Rana jagjeetsinha patil and tanaji sawant : उस्मानाबाद : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (BJP and balasahebanchi Shivsena) यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. (Osmanabad Dustrict) उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. (DPDC) जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार (BJP MLA Rana Patil) भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील […]
ADVERTISEMENT
Rana jagjeetsinha patil and tanaji sawant : उस्मानाबाद : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (BJP and balasahebanchi Shivsena) यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. (Osmanabad Dustrict) उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. (DPDC) जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार (BJP MLA Rana Patil) भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. या तक्रारीत असं दिसून येत आहे की, डीपीडीसीचा 100 टक्के निधी पालकमंत्री (Tanaji Sawant) तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघात वळवून घेतला आहे. त्यामुळं आता भाजप आमदार आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तानाजी सावंत यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. BJP MLA ranajagjeet sinha Complaint against directly to the Ministry
ADVERTISEMENT
ओमराजे निंबाळकरांनी औकात काढली; राणा जगजितसिंह पाटलांनी लायकी सांगत दिलं प्रत्युत्तर
निधी मिळत नसल्याचं प्रमुख कारण सांगून केली होती बंडखोरी
निधी मिळत नसल्याचं प्रमुख कारण सांगून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदारांनी बंडखोरी केली होती. मात्र आता जेंव्हा तेच आमदार मंत्री झाले तर सगळा निधी आपल्याच मतदारसंघात वळवून घेत असल्याचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळं भाजप आमदार आणि बाळासाहेंबाची शिवसेना पक्षाचे मंत्री यांच्यात कुठंतरी संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या तानाजी सावंत आहेत. पालकाने कुटुंबातील सर्वांना समसमान वाटा देणं गरजेचं असतं. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात त्याच्या उलट प्रकार पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. चार पैकी 1 भाजप, 2 बाळासाहेबांची शिवसेना आणि 1 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या आमदारांची संख्या आहे. 2022-2023 सालच्या जिल्हा वार्षिक योजनेचा असणारा संपूर्ण निधी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भूम-परांडा मतदारसंघासाठी प्रस्तावित करून घेतल्याचं समोर आलं आहे. त्या तुलनेत उस्मानाबाद, उमरगा आणि तुळजापूर मतदारसंघासाठी निधीचा विचार केला तर तो शून्य आहे. इतर तिन्ही मतदारसंघासाठी निधी न देता संपूर्ण 100 टक्के निधी पालकमंत्री तानाजी सावंतानी स्वतःच्या मतदारसंघात घेतल्याचा आरोप होत आहे. शून्य निधी प्रस्तावित असलेल्या मतदारसंघात त्यांच्याच पक्षातील आमदार ज्ञानराज चौगुले यांचा देखील सामवेश आहे.
“लाज वाटायला पाहिजे, बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली” : तानाजी सावंत
ADVERTISEMENT
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली तक्रार
याबाबत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निधी वाटपात असमतोलाबाबतची तक्रार केली आहे. आमदार पाटील यांनी प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे. उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना 2023-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असं पत्रात म्हटलं आहे. शासन निर्णयातील विहित निकषानुसार प्रस्तावित करणेबाबत सुस्पष्ट सूचना असताना त्याचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे निधी वाटपातील असमतोल दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून तात्काळ माहिती मागवून योग्य सूचना द्याव्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी 13 फेब्रुवारी रोजी केली आहे.
ADVERTISEMENT
आमदार पाटलांच्या पत्राची दखल
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. उप सचिव सं. ह. धुरी यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांच्या नावाने एक पत्र जारी केले आहे. आमदार महोदयांच्या पत्रातील मुद्द्यांबाबतची मुद्देनिहाय माहिती तात्काळ पाठवण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना 14 फेब्रुवारी करण्यात आल्या आहेत. आता वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण मिटते की जिल्ह्याचं वातावरण तापत राहते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT