नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 12 ठिकाणी ईडीचे छापे; सोनिया-राहुल यांच्या चौकशीनंतर कारवाई

मुंबई तक

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली आणि कोलकातासह 12 ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने नॅशनल हेराल्डच्या दिल्लीतील कार्यालयावरही छापा मारला आहे. हेराल्ड हाऊसच्या चौथ्या मजल्यावर ईडीने झडती घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मजल्यावर नॅशनल हेराल्डचे प्रकाशन कार्यालय आहे. ईडी सकाळी 10 वाजता हेराल्ड हाऊसमध्ये दाखल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली आणि कोलकातासह 12 ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने नॅशनल हेराल्डच्या दिल्लीतील कार्यालयावरही छापा मारला आहे. हेराल्ड हाऊसच्या चौथ्या मजल्यावर ईडीने झडती घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मजल्यावर नॅशनल हेराल्डचे प्रकाशन कार्यालय आहे. ईडी सकाळी 10 वाजता हेराल्ड हाऊसमध्ये दाखल झाली होती.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने नुकतीच सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी केली होती. इतकेच नाही तर यापूर्वी राहुल गांधी यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते.

नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर ईडीचे छापे

ईडीने छापेमारी केली त्यावेळी नॅशनल हेराल्ड कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. सुरक्षा रक्षक वगळता नॅशनल हेराल्ड कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदार उत्तर रेड्डी यांनी ईडीच्या छाप्याबाबत म्हटले आहे की, हे धक्कादायक आहे. हे सर्व राजकीय सुडापोटी सुरु आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरण हे असोसिएटेड जर्नल लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र होते, जे जवाहरलाल नेहरूंनी 500 स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन सुरू केले होते. त्यात इंग्रजांच्या अत्याचाराविषयी लिहिले जायचे.

हे वाचलं का?

    follow whatsapp