भाऊ गेला की वहिनीच्या खोलीत जायचा दीर अन्... एक दिवस पतीला खरं समजलं, पण...

मुंबई तक

बिहारमध्ये एका तरुणाचा आपल्या वहिनीवरच जीव जडला. त्यानंतर महिलेने आपल्या दिरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

वहिनीवरच जडला जीव! दोघे एकट्यात भेटायचे अन्...
वहिनीवरच जडला जीव! दोघे एकट्यात भेटायचे अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वहिनीवरच जडला दिराचा जीव...

point

पती बाहेर गेल्यानंतर दिराला एकट्यात भेटायची अन्...

point

अनैतिक संबंधातून केली पतीची हत्या

Bihar Crime News: बिहारमधून नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाचा आपल्या वहिनीवरच जीव जडला. त्यानंतर महिलेने आपल्या दिरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मृता व्यक्तीचा मृतदेह नदीत सापडला आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

पटना शहरातील बख्तियारपुर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. रवाइच गावाचा रहिवासी असलेला धीरज कुमार अशी मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पत्नीला अटक केली असून आरोपी महिलेचा दिर फरार असल्याचं सांगितलं जात आहे. 

पत्नीने केला मोठा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा आणि पटणाच्या सीमेवर असलेल्या धोबा नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी धीरजच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यास सुरूवात केली. यादरम्यान, मृताची पत्नी शालू कुमारी हिच्या जबाबात बरेच विरोधाभास समोर येऊ लागले. पोलिसांनी तिची काटेकोरपणे चौकशी केल्यानंतर तिच्याकडून एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा करण्यात आला. 

दिरासोबत मिळून रचला हत्येचा कट 

चौकशीदरम्यान आपल्या चुलत दिरासोबत प्रेमसंबंध असल्याचं शालूने सांगितलं. तिचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दोघेही एकट्यात भेटू लागले. शालूचा पती धीरजला हे कळताच तो त्याच्या पत्नीवर प्रचंड रागावला. यानंतर, आरोपी शालूने आपल्या दिरासोबत मिळून पतीचा काटा काढायचा कट रचला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp