अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप; ईडीने नोंदवला डीसीपी श्रीरामे यांचा जबाब

दिव्येश सिंह

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशात अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब आज ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशात अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब आज ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स धाडलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब आता नोंदवण्यात आला आहे.

ईडीच्या सूत्रांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात बदल्यांमध्ये फेरफार आणि ढवळाढवळ यासंबंधीचाही गुन्हा आहे. या प्रकरणात श्रीरामे यांची चौकशी आज करण्यात आली. येत्या काळात आणखी काही डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.

याच प्रकरणात ईडीने आयपीएस अधिकारी जी श्रीधर यांना समन्स बजावलं आहे. अकोला या ठिकाणी ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात. त्यांनाही याच प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. 7 डिसेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे हेदेखील ईडीसमोर हजर झाले होते. 30 नोव्हेंबरला ते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp