Nashik: लाचखोर शिक्षणाधिकारी, नाशकात तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रविण ठाकरे, नाशिक

ADVERTISEMENT

शाळेला मंजूर अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी वैशाली वीर-झनकर व वाहनचालक रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये एका मध्यस्थी प्राथमिक शाळेच्या शिक्षकासह शिक्षणाधिकारी व वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

नाशिकच्या एका खाजगी संस्थेच्या शाळांना 20% याप्रमाणे अनुदान मंजूर झाले होते व याप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्यासाठी संस्थाचालकांकडे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी मध्यस्थ म्हणून काम करतो असे सांगून जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्यासाठी 9 लाख रुपयाची मागणी केली.

ठरल्यानुसार मध्यस्थ शिक्षकाने संस्थाचालक व शिक्षणधिकारी वैशाली वीर-झनकर यांची भेट घालून दिली. तडजोड होऊन 8 लाख रुपये ठरले व ती रोख रक्कम शिक्षणाधिकारी यांचे वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांच्याकडे देण्यास सांगितले. येवले यांनी रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

ADVERTISEMENT

वाहनचालकाने देखील कबूल केले की तो शिक्षणाधिकारी यांच्यासाठी ही रक्कम स्वीकारली. सायंकाळी 5:30 वाजता हा सापळा यशस्वी झाला. तरी त्यांनतर लाचलुचपत विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांचा दालनात झाडाझडती सुरू केली.

ADVERTISEMENT

लाच घेणं पडलं महागात, सरकारने भाजपच्या नगराध्यक्षांवर केली प्रचंड मोठी कारवाई; NCP च्या गोटात आनंद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अजून काय बाहेर पडते यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. वैशाली झनकर यांच्या आधीचे अधिकारी नितीन बच्छाव यांचेही भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे निलंबन झाले होते. त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा कधी थांबेल ही चर्चा जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये होती.

दरम्यान, राज्यातील शिक्षण व्यवस्था विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक भक्कम कशी करता येईल हे पाहणं आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने अधिक काम करणं गरजेचं आहे. मात्र असं असताना जर ग्रामीण भागातील शिक्षणाधिकारी किंवा अधिकारीच लाचखोरी करत असतील त्या सगळ्याचा परिणाम हा एकूणच शिक्षण विभागावर होऊन अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान करणारं आहे. त्यामुळेच अशा लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करुन अशाप्रकारच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे. असं मत आता नागरिक व्यक्त करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT