Speaker of the Assembly: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार? शिवसेनेचा आमदारांना थेट आदेश!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly rainy session) यंदा अवघ्या दोनच दिवसांचं असणार आहे. पण या दोन दिवसाच्या अधिवेशनात बरंच काही घडण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरुन विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जरी दोनच दिवसांचं असलं तरीही यामध्ये बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मात्र, या सगळ्यात सर्वांचं लक्ष हे एकाच गोष्टीवर असणार आहे. ते म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे. (assembly speaker election)

दरम्यान, या दोन दिवसाच्या अधिवशेनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा अंदाज हा शिवसेनेने आपल्या आमदारांना दिलेल्या एका आदेशावरुन वर्तवला जात आहे. हा आदेश नेमका काय आहे आणि तो कोणी जारी केलाय हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपण हे समजून घेऊयात की, विधानसभा अध्यक्ष पदाची पुन्हा निवडणूक का घ्यावी लागणार आहे ते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विधानसभा 2019 निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्त्वाचं पद हे काँग्रेसच्या वाट्याला गेलं. त्या पदावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण साधारण चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाला घटनात्मक दृष्ट्या खूपच महत्त्व असतं. अशावेळी जर या पदासाठी निवडणूक घ्यायची असेल तर सभागृहात मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे ही एक प्रकारे सरकारच्या बहुमताचीच चाचणी म्हणता येईल. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्व आमदारांनी हजर असणं अत्यंत गरजेचं असतं.

ADVERTISEMENT

अशावेळी आता दोनच दिवसांचं अधिवेशन असताना देखील शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या सर्व आमदारांना हजर राहण्यासाठी थेट व्हीप बजावला आहे.

ADVERTISEMENT

Speaker of the Assembly: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

शिवसेनेचा नेमका व्हीप काय?

‘दि. 5 जुलैपासून 2021 रोजीपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन विधानभवन, मुंबई येथे सुरु होणार आहे. सदरहू अधिवेशनात सन 2021-22 च्या पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज, पुरवणी विनियोजन विधेयक यावर चर्चा व मतदान होऊन ते संमत करण्यात येणार आहेत. आता शिवसेना पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांची अधिवेशन काळाता दररोज संपूर्ण दिवस कामकाज संपेपर्यंत उपस्थिती अनिवार्य आहे. असा पक्षादेश आहे.’ असा तीन ओळींचा व्हीप शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना बजावला आहे.

शिवसेनेने जारी केलेला हा व्हीप तीन ओळींचा आहे. त्यामुळे आमदारांना तो टाळता येणार नाही. तो जर टाळला तर आमदारांवर कारवाई होऊ शकते.

शिवसेनेच्या याच व्हीपमुळे आता राजकीय वर्तुळात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, याच दोन दिवसात सरकार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेऊ शकतं.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक सरकारसाठी लिटमस टेस्ट

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही सरकारसाठी एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे. कारण यावेळी सरकारच्या पाठिशी किती आमदार आहेत हे देखील स्पष्ट होणार आहे.

ठाकरे सरकार हे जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्यांच्याकडे 169 आमदारांचं भक्कम असं बहुमत होतं. यामुळे आता जर विधानसभेत पुन्हा अध्यक्षपदाची निवड झाली तर यावेळी मतदानात त्यांना किती मतं पडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात नेमकं काय घडणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT