औरंगाबादमध्ये निर्जन जागी थांबलेल्या कारमध्ये स्फोट, जोडप्याचा होरपळून मृत्यू
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबादमधे एका निर्जनस्थळी उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला. त्यामुळे आत बसलेल्या एका स्त्रीचा आणि पुरूषाचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही अर्धवट जळालेले मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. बुधवारी रात्री चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हे दोघेही प्रेमी युगुल असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नेमकी काय घडली घटना? दुपारी 2 […]
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
औरंगाबादमधे एका निर्जनस्थळी उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला. त्यामुळे आत बसलेल्या एका स्त्रीचा आणि पुरूषाचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही अर्धवट जळालेले मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. बुधवारी रात्री चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हे दोघेही प्रेमी युगुल असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हे वाचलं का?
नेमकी काय घडली घटना?
दुपारी 2 वाजेच्या सुमारास गांधेली शिवारात गुराख्याना स्फोटासारखा आवाज ऐकू आला.काहीतरी विपरीत घडले असावे या संशयातून गुरख्यानी ही माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक गांधेली शिवारात पोहोचले परिसराची पाहणी करताना निर्जनस्थळी पांढऱ्या रंगांची चारचाकी उभी पोलिसांना दिसली.पोलिसांनी त्या वाहनांच्या जवळ जाऊन पाहिले असता, वाहनांमध्ये एक महिला व एक पुरुष भाजलेल्या अवस्थेत निपचित पडलेले दिसले. पोलिसांनी दोघांनाही तातडीने घाटी रुग्णालयात हलविले.मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.घाटीतील वैधकीय अधिकारी यांनी तपासून दोघांना मृत घोषीत केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या घटनेत मृत्यू झालेल्या पुरुषांची ओळख पटली असून रोहिदास गंगाधर आहेर अस त्याच नाव असल्याच समोर आलं आहे. मात्र महिलेची ओळख पटली नाही. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गाडीतील गॅस लिक झाल्याचा अंदाज.
ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळी वाहन सुरू होते. वाहनातील गॅस चा स्फोट झाला असावा त्यामुळे वाहनांतील दोघेही होरपळले असावे. मृताच्या अंगावर मोठं मोठे फोडे आढळून आले आहे. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल अशी माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. तसंच स्फोट नेमका का झाला असेल याचाही शोध पोलीस घेत आहेत.
कारमध्ये एक कपल बसलेलं होतं. एका शेतकऱ्याला स्फोटाचा आवाज आला. त्या आवाजानंतर शेतकऱ्याने आम्हाला कळवलं. आम्ही येऊन बघितलं आणि दोघांनाही रूग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे रूग्णालयाने त्यांनी मृत घोषित केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT