बियाणं आलं पण शेतीपंपाचा विजपुरवठा खंडीत, गेवराईतल्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतातील वीजपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तालुक्यात ही घटना घडली आहे. कृष्णा गायके (वय २३) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून २८ नोव्हेंबरला दुपारी कृष्णाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाने […]
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतातील वीजपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तालुक्यात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
कृष्णा गायके (वय २३) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून २८ नोव्हेंबरला दुपारी कृष्णाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाने आपल्या शेतात कांद्याच्या लागवडीचं बियाणं आणलं होतं. शेतात राबूनही विजेचा पुरवठा नसल्यामुळे त्याची पिकं सुकायला लागली होती. शासनाकडून अद्यापही पिकविमा आणि नुकसानभरपाईची रक्कम आलेली नसतानाही बिल कसं भरायचं हा प्रश्न कृष्णासमोर होता.
वीजबिल थकित असल्यामुळे महावितरणने कृष्णाच्या शेतातला वीजपुरवठा खंडीत केला होता. या परिस्थितीला कंटाळून अखेरीस कृष्णाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचं कळतंय. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्खळी पोहचत मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. शेकाप चे स्थानिक नेते भाई मोहन गुंड यांनी महावितरणने केलेली ही हत्या असून अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT