शेतकरी आंदोलक १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको करणार
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट करत शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. पण आता शेतकरी आणि सरकार यांच्यातली दरी आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं बुधवारी एक मोठी घोषणा केली. येत्या १८ फेब्रुवारीला देशभरात ४ तास रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान […]
ADVERTISEMENT
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट करत शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. पण आता शेतकरी आणि सरकार यांच्यातली दरी आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं बुधवारी एक मोठी घोषणा केली.
ADVERTISEMENT
येत्या १८ फेब्रुवारीला देशभरात ४ तास रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. यात पुढच्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा कशी असेल याबद्दल यात सविस्तर माहिती देण्यात आलीय. बुधवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय.
हे वाचलं का?
4 तासांसाठी रेल रोको
संयुक्त किसान मोर्चाने सांगितल्यानुसार, १२ फेब्रुवारीपासून राजस्थानातले सर्व टोल नाके टोलमुक्त करण्यात येतील. यानंतर १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येईल. देशभर मेणबत्ती मोर्चे, मशाल मोर्चे तसंच आणखी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
१६ फेब्रुवारीला शेतकरी हितासाठी इंग्रजांशी लढणारे, शेतकऱ्यांचे कैवारी सर छोटूराम यांची जयंती देशभर साजरी करण्यात आलीय. यानिमित्त शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यात येणार आहे. तसंच १८ मार्चला देशभर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यात दुपारी १२ ते संध्याकाळी ४ पर्यंत देशभरात रेल रोको होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT