मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला; आत्महत्या का वाढल्या आहेत?

मुंबई तक

महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात यंदा मात्र अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आता पुन्हा इथला शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करतोय. त्याचं कारण आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात यंदा मात्र अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे.

शेतकरी पुन्हा मेटाकुटीला

आता पुन्हा इथला शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करतोय. त्याचं कारण आहे अतिवृष्टी, पीककर्ज व पीकविमा वेळेवर न मिळणे, सावकारी पाश, पिकांवरील रोग या कारणांमुळे मराठवाड्याचा शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बळीराजा गळफास किंवा विष पिऊन आपलं जीवन संपवतोय. मराठवाड्यातील मागच्या काही महिन्यांचा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा पाहिला तर तो चिंताजनक आहे.

मराठवाडा : मागच्या 8 महिन्यात 625 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मराठवाड्यात गेल्या 8 महिन्यात 626 आत्महत्या झाल्यात. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात 109, जालना 77, परभणी 50, हिंगोली 24, नांदेड 89, बीड 170, लातूर 36 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून जात आहे. मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. वेळेवर बँकेचं कर्ज मिळत नाही. पिकविम्याचा हफ्ता भरला तरी दोन- दोन वर्ष पीकविमा मिळत नाही, अशी स्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp