पुणे-अहमदनगर महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातले पाच जण ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्मिता शिंदे, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात आज पहाटे रांजणगाव येथे भीषण अपघात झालाय यात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर एकजण जखमी झालाय. चारचाकी आणि कंटेनर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झालाय.

पुणे नगर रस्त्यावर नेमकी काय घडली अपघाताची घटना?

विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनर ने चारचाकी धडक दिली असून.मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सर्वजण एकाच कुटुंबातील असून ते अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील रहिवासी आहेत.आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात संजय मस्के(वय-५३)रामा मस्के(वय -४५)राजू मस्के-(वय ०७) हर्षदा मस्के (वय -०४),विशाल मस्के (वय-१६) मृत झाले असून साधना मस्के जखमी झाल्या आहेत.असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. हे सगळेजण एकाच कुटुंबातले आहेत. या मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

कार पुण्याहून पनवेलकडे निघाली होती. यावेळी पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्र चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्या मधे आल्याने कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील पाच जणांवर काळाने घाला घातला. अपघात इतका भीषण होता की, कारमधील पाच जण जागीच ठार झाले. या शिवाय कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चुकीच्या बाजूने ट्रक आला. अचनाक रोडच्या मध्ये हा ट्रक आल्याने कारची धडक या ट्रकला बसली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर ही घटना घडली आहे. हे सगळे जण पनवेलला जाण्यासाठी निघाले होते अशीही माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT