बारच्या परवान्यासाठी वय लपवल्याचा आरोप, समीर वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NCB मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी काहीकेल्या संपायचं नाव घेत नाहीयेत. ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडेंविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र दाखवणे, शपथेखालील सरकारी अधिकाऱ्याने खोटी माहिती पुरवणे व अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील बारच्या परवान्यासाठी वय लपवल्याचा आरोप समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी काही महिन्यांपूर्वी समीर वानखेडेंविरुद्ध आरोपांची राळ उठवली होती. त्यावेळी बोलत असताना मलिकांनी समीर वानखेडेंना वयाच्या १७ व्या वर्षी नवी मुंबईतील हॉटेल सदगुरु या बारचं लायसन्स मिळाल्याचा गौप्यस्फोट केला होता. स्थानिक उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असताना त्यांना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी समीर वानखेडेंना हॉटेल सदगुरुचा परवाना मिळाल्याचं दिसून आलं. यावेळी समीर वानखेडे यांचं वय कागदपत्राच्या आधारे १७ वर्ष होतं. काही दिवसांपूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी समीर वानखेडेंच्या बारचा परवाना रद्द केला होता.

समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने बारचं लायसन्स असतानाही त्याची माहिती लपवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपांवर गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन शुल्क विभागासमोर सातत्याने सुनावणी झाली, ज्यात समीर वानखेडेंच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडली. ज्यानंतर वानखेडे यांच्याविरुद्ध IPC च्या १८१, १८८, ४२०, ४६५, ४७८, ४८१ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT