आधी प्राथमिक नंतर माध्यमिक ! देशभरातील शाळा सुरु करण्यासाठी ICMR ने दिला महत्वाचा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभरातील शाळा-कॉलेज बंद आहेत. सध्या राज्यात काही मोजक्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या गावांत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च ने दिलेल्या सल्ल्यानंतर देशभरातल्या शाळा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ICMR ने कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होण्याचा धोका कमी असल्याचं सांगत आधी प्राथमिक आणि नंतर माध्यमिक शाळा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

परंतू शाळा सुरु करण्याचा निर्णय हा पूर्णपणे स्थानिक परिस्थितीचा विचार करुन संबंधित राज्य सरकारने घ्यावा असंही ICMR ने स्पष्ट केलंय. देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत घसरण होत असताना ICMR चे प्रमुख बलराम भार्गव यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना त्यांनी शाळा सुरु करण्याबाबत अनुकूलता दर्शवली.

“लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असते. मुलं विषाणूचा प्रतिकार करु शकतात. लहान मुलांच्या फुफ्फुसात विषाणू शिरकाव करु शकेल असे रिसेप्टर कमी असतात. ६ ते ८ वर्षांच्या मुलांमध्ये जवळपास प्रौंढाइतक्याच अँटीबॉडीज बनल्याचं सेरो सर्वेमध्ये आढळलं आहे. युरोपातही अनेक देशांमध्ये महामारीत प्राथमिक शाळा सुरु होत्या. तिकडे कोणत्याही लाटेत शाळा बंद ठेवण्यात आल्या नव्हत्या. तिकडच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता प्राथमिक शाळा देशात सुरु करता येऊ शकतात असं आमचं मत आहे”, असं बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

Door to Door Vaccination : १ ऑगस्ट राज्य सरकार प्रायोगिक तत्वावर घरोघरी जाऊन करणार लसीकरण

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयाला संमती दर्शवली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी आहे तिकडे टप्प्याटप्प्याने शाळा उघडता येऊ शकतात. ५ टक्क्यांपेक्षा संक्रमण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याची योजना आखली जाऊ शकते असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT