'मुलगा हा शेवटी मुलगाच, त्याच्या चुका माफ केल्या जातात' माजी डीजीपीने सुनेच्या नात्याबाबत काय सांगितलं?
Crime News : पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी अलीकडेच त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूबद्दल आणि कुटुंबाच्या 18 वर्षांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडलेल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांच्या मुलाचा मृत्यू

काय म्हणाले मोहम्मद मुस्तफा?
Crime News : मुलाचे दु:ख फक्त एक वडीलच समजू शकतो. पण, जेव्हा त्या मुलाचे निधन होते तेव्हा ते दु:ख कल्पनेच्या बाहेर असते. अशातच आता पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी अलीकडेच त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूबद्दल आणि कुटुंबाच्या 18 वर्षांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडलेल्या आहेत.
हे ही वाचा : ऐन दिवाळीत वृद्ध महिलेच्या गळ्यावर दिवसाढवळ्या चाकूने वार, घटनास्थळी रक्ताचे वाहिले पाट, पोलिसंही चक्रावले
काय म्हणाले पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा?
मुस्तफा म्हणाला की, हे बघा, मुलाच्या जाण्याचं दु:ख हे फक्त दुसरं तिसरं कोणीही समजू शकत नाही. माझा मुलगा एकुलता एक 35 वर्षांचा होता. सहा-सात दिवस मला एकही फोन आला नाही. ना प्रमुख राजकारण्यांकडून ना अधिकाऱ्यांकडून. मी फक्त माझ्या आठवणींमध्ये आणि धक्क्यात मग्न होता. या काळात, काही लोक माझ्य़ा जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत होते, पण मला भीती वाटत नाही. आता मी माझ्यातील वडील आणि सैनिक जागे केले आहेत, त्यामुळे सत्य उघड होईल.
मुस्तफाने त्याच्या मुलाला गेली 18 वर्षे ड्राग्ज व्यसनाने ग्रासल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. 2006 मध्ये, माझ्या मुलाने शाळेत असताना सॉफ्ट ड्राग्ज वापरण्यास सुरुवात केली. मनातील अॅसिडच्या वापरामुळे त्याचे मन आणि शरीर अधिकच खराब झाले. त्याने अनेकदा सुदारणा करण्याचा प्रयत्नही केला, परंतु मानसिक आणि शारीरिक गुंतागुंत त्याला अनेकदा मागे टाकत असे. त्यानंतर तो म्हणाला की, त्याच्या मुलाच्या मानसिक स्थितीत कधीकधी मानसिक लक्षणे दिसून येत होती, त्याच्या मनात अशा गोष्टी दिसत होत्या, त्या प्रत्यक्षात घडल्या नव्हत्या. ही केवळ ड्रग्ज व्यसनाची मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक संघर्षांचीही एक घटना आहे.
मुस्तफाने कुटुंबात घडलेल्या अनेक धोकादायक आणि दु:खद घटना उघड करण्यात आल्या होत्या. त्याने सांगितलं की, 2019 मध्ये एका खोलीत आग लागली होती. त्याने एकदा त्याच्या सुनेला एका खोलीत बंद करण्यात आले होते. तो वारंवार कर्मचारी आणि कुटुंबाशी हिंसक वृत्ती ठेवत वागू लागला. त्याने स्पष्ट केले की, असे वागूनही कुटुंबाने त्याच्यावर जीवापाड प्रेम करत करुणा दाखवली. या प्रकरणात पोलीस तक्रारी दाखल करण्या आल्या. मुस्तफा म्हणाला की, माझ्या कुटुंबाचे चारित्र्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत.