Pune : शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
पुणे : पुण्यातील माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा सनी निम्हण (माजी नगरसेवक) आणि दोन मुली असा परिवार आहे. निम्हण यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यविधी […]
ADVERTISEMENT

पुणे : पुण्यातील माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा सनी निम्हण (माजी नगरसेवक) आणि दोन मुली असा परिवार आहे. निम्हण यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत.
विनायक निम्हण हे 1999 ते 2014 असे तीन टर्म शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार होते. यातील पहिले दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते. मात्र सध्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक असल्याने निम्हण यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009 मध्ये ते पुन्हा काँग्रेसकडून शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकले.
राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निम्हण यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने ते राणे यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. चव्हाण यांच्या आग्रहामुळेच त्यांनी 2014 ची निवडणूक लढविली. मात्र भाजपचे उमेदवार विजय काळे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
2015 साली विनायक निम्हण यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2017 सालच्या महापालिका निवडणुका शिवसेनेने त्यांच्याच नेतृत्वात लढविल्या होत्या.