शिंदे गटाला पहिला तडा! यवतमाळ जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री (Chief Minister) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंची (Eknath shinde) यवतमाळमध्ये (Yavatmal) डोकेदुखी वाढलीये. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला पहिला तडा गेलाय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकंच नाही तर बेजंकीवार (gajanan bejankiwar) यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. बेजंकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे आहे, त्यांनीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. (Balasahebanchi shiv sena’s Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar has resigned from his post.)

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेला हादरे दिले. राज्यातल्या अनेक भागातले आमदार त्यांनी आपल्याकडे वळवले. खासदारांना सोबत घेतलं. इतकंच नाही, सामाजिक आधारावरील राजकीय समीकरणंही जुळवण्याचा प्रयत्न शिंदे करत आहे. अशातच शिंदेंसमोर पेच उभा ठाकला आहे. हा राजकीय पेच उद्भवला आहे यवतमाळमध्ये.

ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या संजय राठोडांनी शिवसेनेतल्या बंडाळी नंतर शिंदेंना साथ दिली. संजय राठोड यांचा हात धरून गजानन बेजंकीवारही शिंदे गटात सामील झाले.

हे वाचलं का?

नाशिकमध्ये भाजप नामानिराळी : गणित जुळवलं कोणी? फडणवीस म्हणतात…

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत असून, संजय राठोड यांच्या विश्वासातील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बेजंकीवार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाची सुत्रंही त्यांच्याकडे आहे.

ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव देण्यात आलं. बाळासाहेबांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर गजानन बेजंकीवार यांच्याकडे जिल्हाप्रमुख पद सोपवण्यात आलं.

ADVERTISEMENT

Family Man ते निवडणुकीत ट्विस्ट आणणारा नेता, कोण आहेत Satyajeet Tambe?

त्याचबरोबर आर्णी व वणी तालुक्याचंही काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. अशातच गजानन बेजंकीवार यांनी अचानक जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. पांढरकवडा तालुक्यात बेजंकीवार यांचं समर्थ करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. महत्त्वाचं म्हणजे बेजंकीवार यांच्या राजीनाम्यानं शिंदे गटाला पहिला धक्का बसलाय.

गजानन बेजंकीवाराच्या राजीनामा का? राजकीय वर्तुळात काय आहे चर्चा?

2019 मध्ये पांढरकवडा बाजार समितीची निवडणूक झाली होती. 18 संचालक निवडून आले. जान महंमद अब्दुलभाई जिवाणी हे रुंझा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांची सभापतीपदी निवड झाली. तर खैरगाव मतदारसंघातून निवडून आलेले प्रेमदास राठोड हे उपसभापती बनले.

MLC Election : ‘मविआ’त गोंधळ! शिवसेनेनं काँग्रेसला स्पष्ट शब्दात सुनावलं

जिवाणी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर गजानन बेजंकीवार सभापती झाले. तर राठोड उपसभापती कायम राहिले. आता बेजंकीवार यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, त्यांच्यानंतर कुणाची वर्णी लागणार, याची चाचपणी सुरू असतानाच बेजंकीवार यांनी राजीनामा दिलाय. याच मुद्द्यावरून मतभेद झाल्यानं बेजंकीवार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि संजय राठोडांना बेजंकीवार यांची मनधरणी करण्याची वेळ आलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT