Tata Steel चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 60 वर्षापर्यंत मिळणार संपूर्ण पगार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनामुळे देशात कोट्यवधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे जीव गमवाल्याने अनेक कुटुंबं ही उघड्यावर आली आहेत. अनेकांची मुलं निराधार झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक कॉर्पोरेट कंपन्या या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान टाटा स्टीलने मोठी घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

टाटा स्टीलने घोषित केले आहे की, कोरोनामुळे त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास त्या मृत कर्मचाऱ्याची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत (म्हणजे निवृत्तीचे वय होईपर्यंत) त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण वेतन देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनी त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचीही पूर्ण व्यवस्था करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय आणि राहण्याची सुविधादेखील मिळेल.

मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार!

हे वाचलं का?

टाटा स्टील व्यवस्थापनाने म्हटले आहे की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा अंतर्गत मदत करण्यासाठी प्रत्येक संभाव्य पुढाकार घेत आहे. जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍याचे भविष्य चांगले राहील. टाटा मॅनेजमेंटने असे म्हटले आहे की, कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील त्यांच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या व्यक्तीच्या निवृत्तीपर्यंत (60 वर्ष पूर्ण होईपर्यंत) वेतन देईल. याव्यतिरिक्त, फ्रंटलाइन वर्कर जर ड्यूटीवर असताना त्याचा मृत्यू झाला तर अशा कामगारांच्या मुलांचे भारतातील पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च टाटा स्टील कपंनी करेल.

‘या’ देशाचे आभार मानावे तेवढे थोडेच, भारताच्या कठीण काळात अत्यंत मोलाची मदत

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना चांगले पैसे आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळतात. परंतु खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना विशेष काही मिळत नाही. परंतु कोरोना संकटाच्या युगात खासकरुन खासगी कंपन्यांनी या दिशेने औदार्य दाखवून चांगले पाऊल उचलले आहे.

ADVERTISEMENT

रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

कंपनी नेमकं काय म्हटलं आहे?

टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी विचार करीत असते. कोव्हिडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याआधीही टाटा यांनी कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि मानक निश्चित केले आहेत.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT